बिबट्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

बिबट्या
बिबट्या

चांदवड| वार्ताहर | Chandwad

चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील शेतकरी भगवंत गोविंद चौधरी (Bhagwant Govind Chaudhary) हे आपल्या शेतात पिकाला पाणी भरण्याकरिता गेले असता यांच्यावर सकाळी ८ वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला आहे.

हल्ला होताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तात्काळ धाव घेत भगवंत चौधरी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेपर्यंत चौधरी यांच्या चेहऱ्यावर छातीवर व पाठीवर अनेक ठिकाणी बिबट्याने जखमा केल्याचे दिसून आले.

बिबट्या
झारखंडमध्ये 5 नक्षलवाद्यांचा खात्मा

घटनेनंतर त्यांना वडाळीभोई उपकेंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालय (Hospital) येथे दाखल करण्यात आले असून पुढील उपचार डॉ. हेमराज दळवी करत आहे.

दरम्यान या ठिकाणी वनविभागातर्फे पिंजरा लावण्यात आला असून, लवकरच हा बिबट्या (Leopard) पिंजऱ्यात येईल अशी आशा वन अधिकारी वाघमारे यांनी व्यक्त केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com