'या' पाच ग्रामपंचायतींवर तरूणांची सत्ता

'या' पाच ग्रामपंचायतींवर तरूणांची सत्ता

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

तालुक्यातील फुलेनगर, क्रांतीनगर, गिरणानागर, मल्हारवाडी, हिंगणवाडी आदी 5 ग्रामपंचायतीच्या (gram panchayat) निवडणुकीचे निकाल जाहीर (Election results announced) झाले असून अनेक ठिकाणी युवकांनी (youth) बाजी मारली आहे.

नवीन तहसील कार्यालयात (tahsil office) सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरुवात होऊन पहिला निकाल गिरणानगर ग्रामपंचायतीचा लागला. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत (election) पक्षीय राजकारणाला फाटा देण्यात आला असला तरुण पुढार्‍यांच्या पॅनलला चांगले यश मिळाल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाली असून तेथे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) समर्थकांनी सत्ता काबीज केली आहे. तालुक्यातील उर्वरित 5 ग्रामपंचायतींवर नवे कारभारी निवडून आले असून दिवसभर सर्वच राजकीय पक्षांमध्ये (Political parties) आपलाच झेंडा जास्त ग्रामपंचायतींवर फडकल्याचे दावे करण्यात येत होते.

नांदगाव तालुक्यातील (nandgaon taluka) 5 ग्रामपंचायतींच्या 59 सदस्यांची आज निवड जाहीर झाली. निवडणुका चुरशीच्या वातावरणात लढल्या गेल्याने निकाल ऐकण्यासाठी येथील प्रशासकीय संकुल आवाराबाहेर मतमोजणी केंद्र परिसरात उमेदवार, समर्थकांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही जणांनी विजयी उमेदवारांसाठी हारतुरे, वाजंत्री, फटाक्यांची व्यवस्था केली होती. मात्र मतदान केंद्र (polling station) परिसरात अशा प्रकारांना मनाई असल्याने केवळ पुष्पहार घालून अभिनंदन करत गावात जाऊन अनेकांनी आनंद साजरा केला.

ग्रामपंचायतनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

गिरणानगर : प्रमिला अहिरे, योगेश दळवी (बिनविरोध), अनिल आहेर, कोमल आहेर, सुनंदा सोनावणे, सुनील सोनवणे, उमेशकुमार सरोदे, वैशाली कुटे, योगेश दळवी (बिनविरोध), अनिता पवार (बिनविरोध), सुमन ठाकरे (बिनविरोध).

मल्हारवाडी : मीना गोविंद, सरला काकळीज, सारिका जेजूरकर सुनंदा झेंडे, दीपक खैरनार, चित्रा इघे, राहुल पवार (बिनविरोध) तर शोभा बिठे व ताई जाधव यांना समान 158 मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे शोभा पिठे विजय झाल्या.

क्रांतीनगर : प्रियंका पाटील, बेबी पाटील, सचिन मोकळ, पूनम जेजूरकर, संगिता नरोटे (बिनविरोध), कडुबाई काळे (बिनविरोध), इंदूबाई गायकवाड (बिनविरोध), युवराज डोळे (बिनविरोध).

फुलेनगर : शितल जगधने, रामदास जगधने, हिराबाई माळी (बिनविरोध), मिना माळी (बिनविरोध), उषा पाटील (बिनविरोध) तर दोन जागा रिक्त आहेत.

हिंगणवाडी : मनोहर खंबायत, अनुसया गायकवाड, जनाबाई शिंदे, कांताबाई खंबायत, संभाजी बच्छाव, जयराम डोळे, मनिषा डोळे ( बिनविरोध).

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com