ग्रामीण भागात लसीकरणास तरुणांचा प्रतिसाद

लसींचा तुटवडा
ग्रामीण भागात लसीकरणास तरुणांचा प्रतिसाद

दिंडोरी । Dindori

तरुणांचा लसीकरणास प्रतिसाद (Vaccination Response) मिळाला असून ग्रामीण भागातही (Rural Areas) तरुण वर्ग लसीकरण करण्यास जात आहे. तथापि लस पुरवठा (Provide Vaccine) कमी होत असल्याने तरुणांचा हिरमोड होत आहे.

शासनाने सध्या 18 वर्ष वयापुढील लसीकरण (Corona Vaccination) सुरु केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या अचानक वाढली आहे. लस पुरवता पुरवता मात्र शासनाची दमछाक होत आहे. मागणी जास्त लस कमी अशी परिस्थिती झाल्याने प्रचंड तफावत दिसून येत आहे.

सध्या दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात (Dindori Rural Hospital) सकाळी 7 वाजेपासूनच लसीकरणासाठी युवकवर्ग रांगा लावतात. अचानक लस नसल्याचे समजले जाते. अनेकदा रांगेत राहुनही लस मिळत नाही. मागील दाराने जाणार्‍यांची संख्याही दिसून येते.

शासनाने दिंडोरीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात रोज किमान 400 लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शासन स्तरावर सध्या लसीकरणाबाबत गफलत होत आहे. शासकीय नियोजनानुसार दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात कोव्हॉक्सिन लस (Covaxin Vaccine) उपलब्ध असल्याचे दाखवण्यात येते. परंतू ग्रामीण रुग्णालयात गेले असता तेथे कोव्हॉक्सिनचा दुसरा डोस (Corazon Second Dose) असल्याचे दिसते. त्यामुळे अनेकांना परत माघारी फिरावे लागत आहे.

- नीलेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, दिंडोरी

शासनाने दिंडोरी येथील दत्त कृपा हॉस्पिटल येथे कोविशिल्ड ही लस उपलब्ध करुन दिली आहे. शासकीय नियमानुसार 780 रुपयांना लसीकरण केले जात आहे. जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

- डॉ. राजेंद्र वरडे, संचालक दत्त कृपा हॉस्पिटल, दिंडोरी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com