गुन्हा
गुन्हा
नाशिक

गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसांसह युवक ताब्यात

भद्रकाली पोलिसांची कारवाई

Gokul Pawar

Gokul Pawar

जुने नाशिक । Old Nashik

द्वारका चौक परिसरातून पोलिसांनी एका तरुणाला गावठी कट्टा व 5 जिवंत काडतुसेसह ताब्यात घेतले आहेत. भद्रकाली पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून ही कारवाई केली. यामध्ये एकूण 72 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहेत. या तरुणावर भद्रकाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

येथील द्वारका चौक परिसरात एक इसम गावठी पिस्तुलसह पाच जीवंत काडतुसे घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शिताफीने संशयित अराफत फैरोज शेख (२०, इगतपुरी चाळ, वडाळानाका) याला गावठी कट्ट्यासह 5 जिवंत काडतुसे देखील ताब्यात घेतले.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे इसम व वाहनाचे वर्णन जुळून आल्याची खात्री पटताच गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरिक्षक दत्ता पवार, सहायक निरिक्षक ज्ञानेश्वर मोहिते, हवालदार सोमनाथ सातपुते, उत्तम पाटील आदिंच्या पथकाने सापळा रचून शिताफीने अराफतला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता ३० हजार रूपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्तुल व अडीच हजार रूपये किंमतीचे पाच जीवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी असा एकूण ७२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अराफतविरूध्द विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com