धक्कादायक! पिंपळगाव बसवंतच्या युवकाची मालेगावात आत्महत्या

धक्कादायक! पिंपळगाव बसवंतच्या युवकाची मालेगावात आत्महत्या

निफाड | प्रतिनिधी | Niphad

तालुक्यातील पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील युवकाने मालेगाव (Malegaon) शहर पोलीस ठाण्याशेजारीच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे...

मालेगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील राजू नबाब शहा (२७) हा युवक दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथे गेला होता. त्याने मालेगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाशेजारील दत्त मंदिरालगतच्या कंपाऊंड गेटच्या भिंतीच्या अँगलला पिवळी पट्टी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे यांनी युवकास तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

धक्कादायक! पिंपळगाव बसवंतच्या युवकाची मालेगावात आत्महत्या
शिर नसलेल्या मृतदेहाच्या खुनाचा उलगडा; हातातील रबरी बॅन्डवरून ठरली तपासाची दिशा

उपविभागीय पोलीस अधिकारी तेगबीर सिंह संधु यांनी मालेगावचे प्रथमवर्ग दंडाधिकारी व तहसिलदारांना पत्रव्यवहार केला. मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी तेगबीर सिंह संधु, सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. एस. सावंजी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

धक्कादायक! पिंपळगाव बसवंतच्या युवकाची मालेगावात आत्महत्या
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत होणार नदी यात्रेचा शुभारंभ

याप्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनेचा तपास करीत आहे. दरम्यान, पोलीस ठाण्याच्या शेजारीच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com