
नाशिक । प्रतिनिधी Nashik
शहरात आधी अधिकृत वाहनतळ (Official parking) निर्माण करा, मगच टोइंगची कारवाई (Towing action) सुरु करा. अन्यथा आंदोलन (agitation) छेडू, असा इशारा पत्राद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे (City President of NCP Youth Congress Ambadas Khaire) यांनी नाशिक पोलीस आयुक्त दिपक पांडेय (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांना दिला आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेजवळ वाहनतळ (parking) नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. यामुळे वाहनधारक आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभी करतात. अशी वाहने टोइंग केली जातात व वाहनधारकांकडून दंड वसूल (Fine recovered) केला जातो. दंडाच्या नावाखाली काही टोइंग कर्मचार्यांनी आपला धंदा सुरु केला असून यामुळे सरकारी तिजोरीवर याचा फटका बसत आहे.
वाहनतळ नसल्याने अनेक वाहने रांगेत रस्त्याच्या कडेला उभी असल्याने टोइंग कर्मचारी एकही वाहन न सोडण्याच्या लोभामुळे घाईगर्दीने वाहने चुकीच्या पद्धतीने टोइंग करतात. यामुळे अनेक वाहनाने नुकसान होते. वाहनधारकाने याबाबत जाब विचारल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीचे कर्मचारी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन अरेरावीची भाषा करतात. कोरोनामुळे (corona) अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला असताना टोइंगच्या भीतीने ग्राहक खरेदी करिता जात नाही.
नाशिक शहरात रस्त्यावर वाहनतळ सुरु करण्याचा गाजावाजा स्मार्ट सिटीने (smart city) केला. परंतु सद्यस्थितीत महापालिकेचे अधिकृत वाहनतळ नसल्याने वाहनधारक संभ्रमात पडले आहे. नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठेजवळ अधिकृत वाहनतळ उभारल्यानंतरच वाहन टोइंग सुरु करावी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोइंग कर्मचार्यांवर कारवाई करून अनधिकृत टोइंगच्या नावाखालील धंदा बंद करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.