NashiK Crime News : फटाके फोडण्याच्या वादातून युवकाची हत्या

NashiK Crime News : फटाके फोडण्याच्या वादातून युवकाची हत्या

नाशिक | Nashik

शहरातील पाथर्डी फाटा परिसरात (Pathardi Phata Area) फटाके (Firecrackers) फोडण्याच्या वादातून एका युवकाची (Youth) धारदार शस्त्राने हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. ऐन दिवाळीत (Diwali) हत्येची घटना घडल्याने शहरासह पाथर्डी फाटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, गौरव तुकाराम आखाडे (वय ३१, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवार (दि.१२) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पाथर्डी गावातील स्वराज्य नगर (Swarajya Nagar) येथे मयत गौरवच्या घराबाहेर त्याच्या शेजारी राहणारे शिंदे कुटुंबीय फटाके फोडत होते.

NashiK Crime News : फटाके फोडण्याच्या वादातून युवकाची हत्या
IND vs NZ : आज भारत-न्यूझीलंड सेमीफायनल सामना; कुणाचे पारडे जड?

यावेळी आखाडे याने लहान मुले दचकतात म्हणून फटाके मैदानात फोडण्यास सांगितले. मात्र, त्यावेळी काही युवकांशी फटाके फोडण्यावरून वाद झाला. यानंतर काल त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. त्यानंतर शिंदे कुटुंबियातील काहींनी रागाच्या भरात आखाडे याच्यावर धारदार शस्त्राने (Sharp Weapon) सपासप वार केल्याने त्याचा मृत्यू (Death) झाला.

दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघेजण अद्याप फरार असून पोलीस (Police) त्यांचा शोध घेत आहेत.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

NashiK Crime News : फटाके फोडण्याच्या वादातून युवकाची हत्या
राऊतांना शुभेच्छा कधी द्यायच्या 15 एप्रिल की 15 नोव्हेंबरला; नितेश राणेंचा सवाल
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com