
नामपुर | वार्ताहर | Nampur
येथील नामपुर-साक्री रस्त्यावर (Nampur-Sakri Road) दोन दुचाकींची धडक झाल्याने अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. या अपघातात सावतावाडी येथील दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, सावतावाडी (Savatwadi) येथील धनंजय बापू अहिरे (वय २३) हा तरुण आपली दुचाकी क्रमांक (एम. एच. ०४ जी. वाय. ५८१३) ने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकीने (Bike) धडक दिल्याने धनंजय गंभीररित्या जखमी होऊन जागीच गतप्राण झाला.
दरम्यान, याप्रकरणी मयत अहिरे यांचे वडील बापू नामदेव अहिरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून जायखेडा पोलिसांनी (Jaikheda Police) साक्री तालुक्यातील (Sakri Taluka) धमनार येथील किशोर प्रभाकर सोनवणे या दुचाकीस्वाराविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास हवालदार सोनवणे करत आहेत.