पेठ महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार

कुंभाळेनजिक जवळ अपघात
पेठ महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार
USER

पेठ । Peth

पेठ - नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 व कुंभाळे नजिक मोहाचापाडा शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गुजरात राज्यातील युवक चिरडला गेल्याने जागीच ठार झाला.

याबाबत पेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भदरपाडा ( गुजरात) येथील दोन युवक दुचाकी क्रमांक (GJ-15-AN-2405) वर गव्हाचे पोते घेऊन जात असतांना मोहाचा पाडा शिवारात तोल गेल्याने विलासभाई गोविंदभाई फौदार ( वय -26,रा. भदरपाडा) हा रस्त्यावर फेकला गेला. पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने विलास भाई जागीच ठार झाला.

याबाबत जगनभाई पांडूभाई गांगोडा ( रा. विजय पाडा, गुजरात ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलीसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप वसावे, हवालदार व्ही.एस. डंबाळे, दिलीप रेहरे तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com