तरुणाईचे तंदुरूस्तीला प्राधान्य

जॉगिंग ट्रॅक, व्यायामशाळा, फिटनेस सेंटरमध्ये गर्दी
तरुणाईचे तंदुरूस्तीला प्राधान्य

नाशिकरोड । देवळाली कॅम्प | Nashik Road

दिवाळीनंतर (diwali) वातावरणात बदल झाला असून शहराचा पारा घसरायला सुरूवात झाली आहे. हळूहळू थंडीची (cold) तीव्रता वाढली आहे.

करोनामुळे (corona) तंदुरूस्तीचे महत्व अधोरेखित झाले असून प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत (health) जागरूक झाला आहे. पहाटे धुक्याच्या (fog) साक्षीने बोचर्‍या थंडीत फिरावयास जाणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या पंधरवड्यापासून शहरातील सर्वच जॉगिंग ट्रॅक (jogging track), ग्रीन जिम (Green Gym),

व्यायामशाळा (Gym) आणि फिटनेस सेंटरमध्ये (Fitness Center) गर्दी वाढल्याचे दिसून येते. शहरातील सर्वच जिममध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तंदुरूस्तीचे धडे गिरवण्यात तरूणाई मग्न झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे जिम व जॉगिंग ट्रॅकवर महिलांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसते.

यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने तापमान अधिक घसरणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. आरोग्याच्या (health) दृष्टीने फायदेशीर असणार्‍या हिवाळ्यात (winter season) व्यायाम (Exercise) करण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. याशिवाय सकाळ-सायंकाळी खुले मैदान व जॉगिंग ट्रॅकवर फिरणार्‍यांची संख्याही वाढली आहे. नाशिकरोड येथील शिखरेवाडी,

शाळा क्रमांक 125, गांधीनगर, जेलरोड, उपनगर तसेच देवळाली कॅम्पच्या आनंदनगर येथील मैदान, नानेगाव पूल, बार्न्स स्कुल परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तर तरुणाईचा ओघ व्यायामशाळा व फिटनेस सेंटरकडे असल्याचे दिसते. एकंदरीतच शरीरस्वास्थ्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी आबालवृद्ध व्यायामाला पसंती देत असल्याचे समाधानकारक चित्र सध्या दिसून येत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com