
सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
तालुक्यातील नायगाव (Naigaon) येथे दुचाकीवरून जात असताना बिबट्याने हल्ला (Leopard Attack) करून युवकाला जखमी (Injured) केल्याची घटना घडली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, विष्णू सोमनाथ तुपे (३०) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे (Youth) नाव असून हा युवक आपल्या दुचाकीने रात्री मळ्यातून गावात जात असताना झुडुपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) काही अंतर दुचाकीचा पाठलाग करून त्याच्या पायावर पंजा मारून जखमी केले. यावेळी युवकाने दुचाकीचा वेग वाढवत तेथून पळ काढला. यानंतर गावात येऊन गावकऱ्यांना माहिती दिली.
यानंतर तात्काळ वनविभागाला (Forest Department) घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव, एस. एम. बोकडे, वनपरिमंडळ अधिकारी एस. एल. गीते, वनरक्षक जी. बी. पंढरे, बालम शेख, रोहित लोणारे यांनी तात्काळ घटनास्थळी येत युवकाला उपचारासाठी नाशिक (Nashik) येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळत आहे. अशातच आता धावत्या दुचाकीचा (Bike) पाठलाग करून युवकाला जखमी केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये (Farmers) दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरात पिंजरा (Cage) लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.