दिंडोरी : पाय घसरून पडल्याने जानोरी येथील युवकाचा मृत्यू
नाशिक

दिंडोरी : पाय घसरून पडल्याने जानोरी येथील युवकाचा मृत्यू

रामशेज किल्ल्यावरील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

जानोरी | Janori

पाण्याच्या कुंडात पाय घसरून पडल्याने तालुक्यातील जानोरी येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रीतेश समाधान पाटील(१७) असे या युवकाचे नाव आहे.

दरम्यान रितेश हा आपल्या मित्रांबरोबर रामशेज किल्ल्यावर फिरायला गेला होता. यावेळी रामशेज किल्ल्यावरती पोहोचल्यानंतर तो तेथील पाण्याच्या कुंडा जवळ गेला असता त्याचा पाय घसरून कुंडात पडला. त्यावेळी त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूस गंभीर दुखापत झाली

युवकांच्या सहकार्याने त्याला पाण्याच्या कुंडातून बाहेर काढण्यात आले. सोबत असलेल्या मित्रांनी रीतेशला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत उचलून आणले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे रितेशला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सदर घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. जानोरी येथील पत्रकार समाधान छबू पाटील यांचा रीतेश हा एकुलता एक मुलगा असल्याने झालेल्या या प्रकारामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com