वेळुंजे | Velunje

दुगारवाडी धबधब्यात बुडून नाशिक रोड येथील अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

त्र्यंबकेश्वर पासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुगारवाडी या ठिकाणी (दि.१०) रोजी सेल्फी काढत असतांना पाय घसरून पडल्याने डोहात बुडून मृत्यू झाला.आकाश रोहिदास पगारे असे मृत युवकाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की आकाश पाच मित्रा समवेत दुगारवाडी धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता. यावेळी फोटो काढण्याच्या नादात त्याचा बुडून मृत्यू झाला. आकाश हा पगारे कुटूंबातील एकुलता एक असल्याने कुटुंबासह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

सदरची घटना कळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रणदिवे, पोलीस शिपाई सचिन थेटे, पो.ह.अहिरे, पो.ढोबळे या पथकाने मृतदेहास बाहेर काढले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.