दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

नामपूर | वार्ताहर | Nampur

बिजोरसे ता. बागलाण येथील तरुण बिजोरसेवरून नामपूरकडे जात असताना बुधवारी रात्रीच्या सुमारास अपघात होऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मात्र या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे...

नितीन प्रभाकर काकडे (32) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नितीन काकडे हे वीज वितरण कंपनीत कर्मचारी होते. बुधवारी रात्रीच्या वेळी एम. एच. 41 ए. एच. 406 या मोटारसायकल वर नाईट ड्युटीवर जाण्यासाठी ते बिजोरसे गावातून जात होते.

नामपूर साक्री रस्त्यावरील वडाच्या झाडा शेजारी त्यांचा अपघात झाला. मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे हा प्रकार कोणाच्याच लक्षात आले नाही. गुरुवारी पहाटे मृतदेह रस्त्याच्या बाजूला पडलेला आढळून आला. अपघाताचे कारण अजूनही अस्पष्टच आहे.

बिजोरसे गावातील सामाजिक कार्यकर्ते बाबाजी काकडे, सुनील काकडे यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस कर्मचारी गुंजाळ पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह नामपूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
राज्यपालांना शरद पवारांचा सणसणीत टोला; म्हणाले, वादग्रस्त वक्तव्य करणे...

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण, दीपक पगार, नामदेव सावंत यांनी काकडे परिवाराला वीज वितरण कंपनीमार्फत तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे.

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
संतापजनक! नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मोटार अपघात कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास जायखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी श्रीकृष्ण पारधी करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, नामपूर-साक्री रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com