
सातपूर l Satpur (प्रतिनिधी)
सातपूर कॉलनीतील गुरुवारी मध्यरात्री दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना काल (दि. २१) मध्यरात्री घडली.
सातपूर कॉलनीतील मनाज वाईन येथे काल (दि. २१) रात्री १२.१० वा. नाशिककडून त्रंबकेश्वरकडे डबलशीट सुझुकी अॅकस्सेस (एम. एच १५ एच बी ३२८६) या दुचाकीवर असलेले राजू पावरा यांना दुचाकी (एम. एच १८ बी. के ४९४७)ने समोरासमोर धडक दिल्याने या भीषण अपघातात राजू पावरा यास डोक्यास व हाता-पायाला जबर मार लागल्याने पोलिसानी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयातील डॉ राहुल पाटील यांनी मध्यरात्रीपावरा यांना मृत घोषित केले.
त्याचवेळी दुसर्या दुचाकीवरील दोघा अज्ञात मोटर सायकलस्वारांंची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सातपूर पोलिसांनी या अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वपोनि राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवा चव्हाण करीत आहे.