जानोरी -आंबे-दिंडोरी रस्त्यावरील अपघातात युवकाचा मृत्यू

जानोरी -आंबे-दिंडोरी रस्त्यावरील अपघातात युवकाचा मृत्यू
USER

जानोरी । janori

दिंडोरी तालुक्यातील जानोरी शिवारातील जानोरी -आंबे दिंडोरी रस्त्यावर १८ रोजी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या मोटर सायकलस्वाराचा गाडीवरचा ताबा सुटत गाडी स्लिप होऊन झालेल्या अपघातात मखमलाबाद येथील युवक मयत झाला आहे.

याबाबतचे वृत्त असे की गुरूवार (दि.१८) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आंबेदिंडोरी कडून जानोरी कडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास जानोरी नजीक वळणाचा अंदाज न आल्याने समोर असलेल्या झाडावर आदळून अपघात झाला.

या अपघातात मखमलाबाद येथील अनिल सुनील कोठुळे (वय २६) यास डोक्यास गंभीर मार लागल्याने अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

यावेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले याबाबत अधिक तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com