
सिन्नर । Sinnar
सिन्नर-घोटी महामार्गावर (Sinnar-Ghoti highway) सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) पांढुर्ली शिवारात (Pandhurli Shivar) कारच्या अपघातात एकाचा मृत्यू (Death) तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे....
याबाबत अधिक माहिती अशी की. पवन सुनिल भाटजिरे (रा. गावठा, सिन्नर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पवन व त्याचे दोघे मित्र सोपान विष्णू लोंढे व अक्षय राजेंद्र लोंढे हे आपली कार (एम. एच. ४८ बी.एच. ७१९२) ने सिन्नरहून घोटीकडे (Sinnar to Ghoti) जात होते.
यावेळी पांढुर्ली शिवारातील गीता पेट्रोलपंपाजवळ कार आली असता समोरून येणारी वॅगनार (एम. एच. ०४ एल. क्यू. २४८५) ने ओव्हरटेक करताना त्यांच्या कारला (Car) कट मारल्याने कारचा अपघात (Accident) झाला.