विजेचा खांब कोसळल्याने एकाचा  मृत्यू
नाशिक

विजेचा खांब कोसळल्याने एकाचा मृत्यू

Nitin Gangurde

सुरगाणा/पळसन । वार्ताहर

सुरगाणा तालुक्यातील माणी येथे विजेचा खांब कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विजय रमेश कहांडोळे यांचा माणी येथे हॉटेल व्यवसाय आहे. तो आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास दुकान उघडून पिण्याचे पाणी आणण्याकरिता लहान भावासोबत निघाला होता.

कमानी पासून 500 मीटर अंतर पुढे गेल्यानंतर विजपुरवठा करणारा खांब कोसळला. चालक विजय कहाडोळे याच्या अंगावर तारा पडल्या. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्याच्या पाठीमागे बसलेल्या लहान भावाला विजेचा धक्का बसला. मात्र तो या दुर्घटनेतून बालंबाल बचावला. सुरगाणा पोलीस निरीक्षक दिवानसिग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर नाद्रे यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करत आहे.

माणी येथील तरूण युवक पाणी आणण्यासाठी जात असताना अचानक अंगावर विजेचा खांब कोसळून सदर तरूणाचा जागीच मृत्यू झाला. हा तरूण लहान व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या घरातील कमवता तो एकटाच होता. या तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी लेखी स्वरुपात निवेदन उपअभियंता सुरगाणा याना दिले आहे.
राजु राऊत, तालुकाध्यक्ष- श्रमजिवी संघटना
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com