सुरगाणा : गोणदगड येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यु

शेतात काम करतांना
सुरगाणा : गोणदगड येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यु
सुरगाणा

सुरगाणा | Sarvana

तालुक्यातील खुंटवहीर जवळील गोणदगड येथील सुनील हरी वाघमारे (२१) या तरुणाचा सर्पदंशाने मृत्यु झाला आहे.

दरम्यान सुनिल हा शेतात भात लावणीचे काम करीत असतांना सर्पदंश झाल्याने त्यास तातडीने सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात

उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी शासकीय जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा त्याच्यावर गोणदगड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com