काजीसांगवी येथे शेततळ्यात पडून युवकाचा मृत्यू

काजीसांगवी येथे शेततळ्यात पडून युवकाचा मृत्यू

काजीसांगवी । Kajisanghvi

चांदवड तालुक्यातील काजीसांगवी येथील युवक तळ्यात पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

बंगल्याचे काम सुरु असल्यामुळे तळ्यातील मोटर चालु करण्यासाठी गेल्यानंतर त्याचा तळ्यात झोक गेल्यामुळे तो पाण्यात पडला. आता त्याला तळ्यातून बाहेर काढून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. सदर युवकाचे नाव कल्पेश नंदु मेचकुल असे आहे.

चांदवड उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचारासाठी नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे काजीसांगवी गावावर शोककळा पसरली आहे. सर्वत्र या घटनेची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com