माडसांघवी येथे विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

माडसांघवी येथे  विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू

नाशिक | Nashik

विहिरीच्या कठड्यावरून पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक तालुक्यातील माडसांगवी येथे घडली.

योगेश मुकुंद येवले (२८, रा. माडसांगवी, ता. नाशिक) असे या घटनेतील मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय हा मडसांगवी गावा जवळील कानिफनाथ मंदिरा शेजारी असणार्‍या विहिरीजळ उभा होता. कठड्यावरून चालताना त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला.

पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीसांत नोंद करण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com