दिंडोरी : गॅलरीतून पडल्याने युवकाचा मृत्यू
दिंडोरी

दिंडोरी : गॅलरीतून पडल्याने युवकाचा मृत्यू

परिसरात हळहळ

दिंडोरी | Dindori

दिंडोरी येथे गॅलरीतून पडल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

विशाल शिवाजी कोरडे असे या युवकाचे नाव आहे. नाभिक समाजाचे युवक कार्यकर्ते असलेले विशाल हा सकाळी नळाला पाणी आल्यावर रो हाऊसच्या वर असलेल्या टाकीवर पाणी पहायला गेला होता. टाकी भरल्याचे लक्षात आल्यावर त्याने आईला आवाज दिला.

यावेळी गॅलरीतुन तोल गेल्याने तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला मार लागून अधिक रक्तश्राव झाल्याने त्याचे निधन झाले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात त्यास मृत घोषित करण्यात आले.

नाभिक समाजाचे जेष्ठ नेते शिवाजी कोरडे यांचा तो मुलगा होता. ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने निर्मला विहार परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com