
दहिवड | प्रतिनिधी | Dahiwad
नातलगाच्या लग्नसमारंभासाठी जात असतांना अज्ञात वाहनाने दुचाकीला (Bike) धडक दिल्याने अपघात घडला आहे. या अपघातात देवळा तालुक्यातील (Devla taluka) खारीपाडा येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला...
याबाबत अधिक माहिती अशी की, अण्णा नामदेव पवार असे अपघातात मृत्यू (Death) झालेल्या युवकाचे नाव आहे. हा युवक आपली डिस्कवर दुचाकी क्रमांक एमएच ४१ वाय ९३७३ ने मालेगाव तालुक्यातील (Malegaon taluka) दहिवाळ (Dahiwal) येथे लग्नासाठी जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने दुचाकीला दहिवाळजवळ धडक दिल्याने या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच पवार याच्या निधनाने खारीपाडा गावावर (Kharipada Village) शोककळा पसरली आहे.