पाण्यात पडून शॉक लागल्याने इसमाचा मृत्यू

पाण्यात पडून शॉक लागल्याने इसमाचा मृत्यू

देवळालीतील लॅमरोड येथील घटना

देवळाली कँम्प | Deolali Camp

लँमरोड येथील मेरूभूमी सोसायटी त स्विमींग टँकमध्ये पोहण्यास गेलेले किर्तीकुमार पोपटलाल शहा (५२) यांचा शॉक बसून म्रुत्यू झाला.

सोमवारी सांयकाळी सहा वाजेदरम्यान लँमरोड बालग्रुह येथील मेरूभूमी सोसायटीत स्वीमींग टँकमध्ये किर्तीकुमार शहा पोहण्यास गेले. तिथे पाण्यात उतरल्यानंतर अचानक विद्युत प्रवाह पाण्यात उतरला व पाण्यात शॉक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

किर्तीकुमार शहा यांचा साडेसहा वाजेपर्यंत परत न आल्याने आजूबाजूला शोधाशोध सुरू झाली होती. आठवाजेदरम्यान अचानकपणे कोणीतरी स्वीमींग टँकमध्ये डोकावले असता ते पाण्यात पडलेले दिसून आले. याबाबत पोलीस ठाण्यात कळविण्यात आला. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर शहा यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे नेण्यात आले.

याबाबत देवळाली कँम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. साडेपाच वाजता मेरूभूमी सोसायटी त पंधरा पेक्षा जास्त मुले त्याच स्विमींग टँकमध्ये पोहत होते. किर्तीकुमार शाह पोहण्यास गेले तेव्हा विद्युत पुरवठा खंडित होता.

अचानकपणे सहा मिनटे विद्युत पुरवठा सुरळीत झाला व पुन्हा खंडित झाला त्या सहा मिनटांतच विद्युत पुरवठा पाण्यात प्रवाहित झाला अन् किर्तीकुमार शहा यांचा शॉक बसून मृत्यू झाला अशी चर्चा लँमरोड परिसरात होऊन हळहळ व्यक्त होत होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com