
सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar
तालुक्यातील उजणी (Ujani) येथे पाण्यात बुडून (Drowning) अठरा वर्षीय तरूणाचा (Youth) मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल बाळासाहेब महालखेडकर असे मृत तरूणाचे नाव आहे. राहुल हा काल दुपारच्या सुमारास उजणी-मिटसागरा रोडवर असलेल्या स्वताच्या शेतात पायी गेला होता.
परंतु सायंकाळी तो घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी मित्रपरिवार व आसपासच्या लोकांकडे चौकशी (inquiry) असता तो मिळून आला नाही. त्यामुळे गावातील तरूणांनी परीसरातील विहीरी, पाझर तलाव, मका व ऊसाच्या शेतात रात्री उशिरापर्यंत राहुलचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही.
त्यानंतर आज सकाळी येथील स्थानिक शेतकरी (Farmer) आण्णा निवृत्ती सापनर हे आपल्या शेतातून मिठागरे-उजणी रस्त्याने जात असतांना त्यांना रस्त्यालगत असलेल्या विहीरीत (well) राहुलचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसला. यानंतर पोलीस पाटील दत्तात्रय पवार यांनी तात्काळ घटनेची माहिती मुसळगाव पोलीस ठाण्याला (Musalgaon Police Station) दिली असता पो. हवालदार जयंत जगताप यांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्युची नोंद केली.