
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
संपूर्ण देशासह राज्यात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला असून देशाचे भविष्य असलेल्या युवकांच्या हाताला काम नाही. या प्रश्नावर केंद्र व राज्य शासन मूग गिळून आहे. वाढलेली बेरोजगारी, महागाई, शेतमालाला हमीभाव मिळावा, कांद्याचे अनुदान वाढवून मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेसतर्फे दि.२० मार्चला विधानभवनाला घेराव घालत आंदोलन करण्यात येणात आहे, अशी माहिती प्रदेश युवक काँग्रेसचे याध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली...
नाशिक शहर व जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी (दि.14) काँग्रेस भवन येथे प्रदेशाध्यक्ष राऊत यांच्या उपस्थितीत युवा संवाद मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. युवकांच्या प्रश्नांसाठी असलेल्या या आंदोलनात तरूणांनी सहभागी होऊन शासनाला जाब विचारावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड, महिला शहराध्यक्षा स्वाती जाधव, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, प्रदेश काँगेस सचिव राहूल दिवे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, प्रदेश महासचिव दिपाली ससाणे, मुख्य प्रवक्ते दिपक राठोड, नाशिक युवक शहराध्यक्ष स्वप्निल पाटील, प्रदेश सरचिटणीस गौरव पानगव्हाणे, प्रदेश सचिव शुभम गिरडकर, जिल्हा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष हनीफ बशीर, प्रदेश महासचिव दिपाली ससाणे, मुख्य प्रवक्ते दिपक राठोड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतपराव सकाळे, प्रदेश सरचिटणीस गौरव पानगव्हाणे, प्रदेश सचिव शुभम गिरडकर, जिल्हा अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष हनीफ बशीर, सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर आदी उपस्थित होते.
राऊत यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्यावर राज्यातील सत्ताधारी भाजपावर टिकास्त्र सोडले. महागाई गगनाला भिडलेली असताना यावर केंद्र सरकार गप्प आहे. केवळ पक्षाचे नेते राहुल गांधी महागाई व बेरोजगारी विरोधात बेधडकपणे बोलत असल्याचे ते म्हणाले.
पक्षाची मुळ ताकद युवक आहे. यासाठी युवक संघटना बळकट करण्यावर लक्ष केंद्रीत करावे, गाव तेथे शाखा उपक्रम राबवावा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवकांना 50 टक्के तिकीटे दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
युवकांना पक्षाशी जोडून संघटन मजूबत केल्यास आगामी काळ पक्षाचा चांगला असेल असा विश्वास शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केला. युवकचे अध्य़क्ष स्वप्नील पाटील यांनी प्रस्ताविकात कार्यकारिणीचा अहवाल सादर केला.
मेळाव्यास प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ,वत्सला खैरे, आशा तडवी, अल्ताफ शेख, बबलू खैरे, उध्दव पवार, विजय पाटील, संतोष मुन्ना ठाकूर, किरण जाधव, दिपांशू जाधव आदी युवक तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष उपस्थित होते.
समांतर काँग्रेसची मेळाव्याकडे पाठ
शहराध्यक्षपदी आकाश छाजेड यांची नियुक्ती झाल्याने त्यांच्या विरोधात असलेल्या गटाकडून छाजेड यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली जाते.हा सिलसिला कायम असल्याचे दिसून आले.युवक काँग्रेसचा मेळावा असताना समातंर काँग्रेस नेत्यांनी ₹ मेळाव्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
कांद्याच्या माळा घालत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मेळाव्यानंतर प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वखाली शेतक-यांच्या अन्यायविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर ढोल वाजवत मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. कांद्याला अनुदान कमी दिल्याच्या निषेर्धात कांद्याच्या माळा घालत जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी निवेदन दिले. शेतकऱ्यांना मालाला हमीभाव द्यावा, कांद्याचे हेक्टरी एक हजार रूपये अनुदान द्यावे, शासकीय कर्मचा-यांची जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या.