Nashik News : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत युवकाची आत्महत्या

Nashik News : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत युवकाची आत्महत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या टागोर नगर परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून युवकाने (Youth) उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, शंतनु सुनील जाधव (वय २२) राहणार, शारदा संकुल, टागोरनगर, नाशिकरोड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या युवकाने परिसरात असलेल्या राज ज्वेलर्स बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून (fourth floor) उडी मारली असता त्याच्या डोक्याला हाताला व छातीला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

दरम्यान, त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी उपनगर पोलिसांनी (Upnagar Police) अकस्मात मृत्यूची (Death) नोंद केली असून पुढील तपास हवालदार गोसावी हे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com