सप्तशृंगी गडावर गळफास घेत युवकाची आत्महत्या

सप्तशृंगी गडावर गळफास घेत युवकाची आत्महत्या

वणी | वार्ताहर | Vani

येथील सप्तशृंगी गडावर (Saptshringi Gadh) भवानी पाझर तलावाजवळ १९ वर्षीय युवकाचा मृतदेह (dead body) झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, आज (दि.१५) रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भवानी पाझर तलावाकडे (Bhawani Pazar Lake) ग्रामपंचायत कर्मचारी परशुराम गांगुर्डे पाणीपुरवठा करण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यालगत झाडाला एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यावेळी या घटनेची माहिती त्यांनी लगेचच नांदुरी पोलीसांना (Nanduri Police) दिली.

यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सदर युवकाची तपासणी केली असता त्याचे नाव समाधान संजय पठाण (रा. पाळद, जि.धुळे) असे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तपास करत मयत युवकाच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली.

दरम्यान, याप्रकरणाचा पुढील तपास (investigation) पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खाडे,पोलीस कर्मचारी कोशिरे, ब्राम्हणे करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com