
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune Highway) असलेल्या चेहडी येथील दारणा नदीच्या पात्रात (Darna River Bed) एका युवकाने (Youth) उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. तसेच सध्या सदर युवकाचा मृतदेह (Dead Body) शोधण्याचे काम सुरू आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिकेत बोराडे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून तो येथून जवळच असलेल्या चेहडीगाव (Chehadigaon) परिसरात राहत होता. रविवारी (दि.१२) रोजी रात्रीच्या सुमारास घरातील किरकोळ भांडणाच्या कारणावरून तो घराबाहेर पडला व त्यानंतर त्याने चेहडी येथे दारणा नदीच्या पात्रात उडी (Jump) मारून आत्महत्या केली.
दरम्यान, ही घटना समजताच अग्निशामक दलाच्या (Fire Brigade) कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदर युवकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, अद्यापही त्याचा मृतदेह सापडलेला नसल्याचे समजते.