
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
भारतात दर महिन्याला पाच लाख अपघात (accidents) होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अपघातात जागीच मृत्यू (death) होण्याचे प्रमाण दीड लाखांच्यावर आहे. यामध्ये 18 ते 44 वयोगटातील वाहनधारकांचा जास्त समावेश असल्याचे दिसून येते.
अपघातामुळे 56 टक्के लोक रस्त्यावरच मृत्युमुखी होतात. यासाठी तरुण (youth) मुला-मुलींनी वाहन चालकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राजेंद्र लोखंडे (Assistant Police Inspector Rajendra Lokhande, Transport Branch) यांनी केले. सिन्नर महाविद्यालयात ग्रामीण जिल्हा पोलिस यांच्यावतीने रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत (Road safety campaign) जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लोखंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. व्ही. रसाळ होते.
महेंद्रा कंपनीचे प्रोजेक्ट सुपरवायझर श्रेयस गायधनी यांनी जनजागृती पर उपक्रम हाती घेतला असून शून्य टक्के अपघाताचे प्रमाण कसे करता येईल यासाठी त्यांनी आवाहन केले. आतापर्यंत दोन लाख लोकांपर्यंत जनजागृती उपक्रम (Public awareness activities) हा पोहोचवलेला आहे. वाहनाचा इन्शुरन्स (Insurance) असणे आवश्यक आहे. अपघात (accidents) झाल्यास मृत्यू होतो किंवा कायमचे अपंगत्व येते.
यामुळे त्या कुटुंबाला अपंगत्व आलेल्या व्यक्तीला सांभाळणे किती कठीण असते हे गायधनी यांनी लक्षात आणून दिले. प्राचार्य डॉ. रसाळ यांनीही विद्यार्थ्यांना (students) मार्गदर्शन केले. स्वत:ला शिस्त लावून घेतली पाहिजे. सुरक्षितता पाळली पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्या आई-वडिलांबरोबर सांगितली गेली पाहिजे. रस्त्याने चालताना आपण रस्त्यावर दिलेल्या शासकीय फलकांचा आधार घेऊन नियमांचे पालन करावे.
यामुळे आपण स्वत:ला व इतरांना अपघातापासून वाचवू शकतो असे रसाळ म्हणाले. आर. टी. सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. हवालदार प्रकाश सगळे, नाईक एस. के. आढाव, एन. एस. आव्हाड, जे. एस. कटाळे, एस. व्ही. जाधव, एस. एन. कदम, डी. जे. पगार उपस्थित होते. सूत्रसंचलन एस. झेड. ठाकरे यांनी केले. आभार एस. जी. भागवत यांनी मानले.
नियमांचे धडे
18 वर्ष वयोगटाच्या आतील विद्यार्थ्यांनी वाहन चालवू नये. स्वतःचे लायसन असावे, मोटरसायकलवर हेल्मेट, चारचाकीमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट लावणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, वाहन चालवताना काय करावे काय करू नये यासंदर्भात लोखंडे यांनी माहिती दिली. शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई होतेच. परंतु, अपघात झाल्यास कुटुंबांना दुःखाला सामोरे जावे लागते. वाहन चालवताना कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी त्यांनी माहिती दिली.