नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरात ऑनलाईन फसवणुकीचे (Online Fraud) प्रकार सुरूच असून ५० कोटी रुपयांची लॉटरी (lottery) लागल्याचे आमिष दाखवून तरुणाची तब्बल ७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी राहुल मुरलीधर मंडलिक (वय ३२, रा. सावरकर चौक, नवीन नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली आहे....
याबाबत अधिक माहिती अशी की, मंडलिक हे दि. १३ फेब्रुवारी रोजी घरी असताना अज्ञात टेलिग्रामवरील आय. डी. धारकाने (Unknown Telegram ID Holder) त्याच्याशी संपर्क साधून ५० कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखविले.
दरम्यान, यानंतर त्या भामट्याने मंडलिक यांना वेगवेगळ्या चार्जेसचा बहाणा करुन स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, येस बँकेच्या खात्यांवर, तसेच गुगल पे यूपीआय खात्यावर १३ फेब्रुवारी ते १३ मे २०२३ या काळात एकूण ७ लाख ७ हजार ५९४ रुपये ८३ पैसे उकळले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.