Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! तीक्ष्ण हत्याराने युवकाचा खून

Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! तीक्ष्ण हत्याराने युवकाचा खून

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात पुन्हा एकाचा खून झाल्याची घटना आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील जेजुरकर मळा टाकळी परिसरात शनिवारी रात्री घडली....

चार अज्ञात हल्लेखोरांनी एका टायर पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जागीच ठार केले. दरम्यान पोलिसांच्या वतीने गुन्हेगारांचा शोध सुरू असून सुमारे चार पथक गुन्हेगारांच्या मागावर गेल्याचे समजते.

Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! तीक्ष्ण हत्याराने युवकाचा खून
Nashik Accident : दोन एसटी व ट्रकचा तिहेरी अपघात; पाच जखमी

गुलाम रब्बानी असे मयत झालेल्या पंक्चर काढणाऱ्या युवकाचे नाव आहे. नाशिक छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या जेजुरकर लॉन्स जवळ रात्री आठच्या सुमारास ही घडला घडली. सूत्रांच्या माहितीप्रमाणे चार संशयितांनी तीक्ष्ण हत्याराने रब्बानीवर वार केले.

Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरलं! तीक्ष्ण हत्याराने युवकाचा खून
Nashik Accident : पिकअपची झाडाला जोरदार धडक; तीन ठार, १३ जखमी

पोटात व डोक्यावर मार लागल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला तर हल्लेखोर यांनी तेथून पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती मिळतात पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. त्यांनी तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी सुरू होती. पोलीस पुढील तपास करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com