चांदेश्वरी धबधबा
चांदेश्वरी धबधबा
नाशिक

चांदेश्वेरी धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

नांदगाव तालुक्यातील घटना

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव | Nandgoan

तालुक्यातील चादेश्वेरी येथील धबधब्याच्या पाण्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. किशोर बारगळ (३०)असे या तरुणांचे नाव आहे.

चादेश्वेरी (कासारी) येथे दर्शनासाठी पोखरी ता.वैजापूर येथून सहा मित्रांचा समूह शनिवारी दुपारी येथे आला होता. या ठिकाणी असलेला धबधबा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू आहे. किशोर दादासाहेब बारगळ (३०) व त्यांचे सहकारी या धबधब्याच्या खाली पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पोहत असतांना किशोर यांस पाण्याचा अदांज न आल्याने तो बुडू लागला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न त्याच्या मित्रांनी केला परंतु तो पाण्यात बुडाला.

यावेळी पोलिसांना कळविण्यात आले तात्काळ पोलिस निरीक्षक संतोष मटकुळे, रमेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चांदोरी ता.निफाड येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. तब्बल सहा तासानंतर किशोरचा मृतदेह आढळून आला.

याबाबत नांदगाव पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.ह.आर. व्ही. पवार हे करत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com