वालदेवी धरणात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू

वालदेवी धरणात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू

नवीन नाशिक । Nashik

विल्होळी नजीकच्या वालदेवी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या पवननगर येथील एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतदेह सापडत नसल्याने स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने तब्बल दोन तासानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

नवीन नाशकातील पवन नगर येथील कमलेश सोनवणे (१८), यश भोसले (१८), भूषण गोलाईट (१९), नियोद्दीन मंसुरी, (१८), प्रफुल आव्हाड (१९) हे पाचही तरुण शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्यां दरम्यान वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. यातील कमलेश सखाराम सोनवणे (१८) हा पोहण्यासाठी पाण्यात उतरला, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

यानंतर सोबत असलेल्या मित्रांनी खुप वेळ आरडाओरड केल्यानंतर स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने साडेपाच वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.

यानंतर वाडीवाऱ्हे पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com