नाशिक | Nashik

गिरणा धरणावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा सेल्फी काढताना तोल गेल्याने धरणात बुडून मृत्यू झाला.

चाळीसगाव येथील नयन रवींद्र शिरोळे हा तरुण पर्यटनासाठी मित्रांबरोबर गिरणा धरणावर आला होता. सुरक्षारक्षकाची नजर चुकून तो धरणाच्या काठावर उभा राहून सेल्फी काढत असताना तो जाऊन धरणात बुडाला.

मालेगावातील अग्निशमन दलाच्या पथकाने शोध घेऊन धरणातून त्याचा मृतदेह काढला. मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.