Nashik News : सप्तशृंगी गडावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Nashik News : सप्तशृंगी गडावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptshringi Gad

येथे जळगाव जिल्ह्यातून (Jalgaon District) हमाली कामासाठी आलेल्या एका तरुणाने (Youth) नवीन बांधकाम ठिकाणी चौथ्या मजल्यावर दोरीच्या सहाय्याने गळफास (Hanging) घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. संतोष माधव भावसार (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच या घटनेची नोंद कळवण पोलिसांत करण्यात आली आहे....

Nashik News : सप्तशृंगी गडावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Nashik News : ढगफुटीसदृश्य पाऊस की चक्रीवादळामुळे उडालेला पाण्याचा फवारा? नेमका प्रकार काय?

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष भावसार हा सप्तशृंगी गडावर हमाली काम करून उदरनिर्वाह करत होता. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घरमालक बापू कारगिल यांनी बांधकाम ठिकाणी (Construction Site) पाणी मारण्यासाठी पाण्याची मोटर सुरु केली. त्यावेळी प्लास्टिकच्या पाईपमध्ये पाणी येत नसल्याने ते बांधकाम ठिकाणच्या चौथ्या मजल्यावर बघण्यासाठी गेले असता त्यांना मयत संतोष उर्फ (भंभ्या) भावसार दोरीच्या साह्याने तसेच पाण्याच्या पाईप नळीत गुंतल्याचे दिसून आले.

Nashik News : सप्तशृंगी गडावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Aaditya Thackeray : "यह डर अच्छा है" असे म्हणत आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंसह सरकारवर हल्लाबोल

यानंतर कळवण पोलीस ठाणे (Kalwan Police Station) अंतर्गत नांदुरी पोलीस दुरक्षेत्रातील पोलिसांना (Police) बांधकाम मालक यांनी कळविले असता पोलिसांनी मयत भावसार याच्या आधारकार्डची चौकशी करत त्याच्या कुटुंबियांना संपर्क करून मृतदेह (Dead Body) शवविच्छेदनासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

Nashik News : सप्तशृंगी गडावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Lok Sabha Election : मिशन ४५ साठी भाजपचा मेगाप्लॅन; 'या' विद्यमान आमदारांना उतरवणार रिंगणात

त्यानंतर डॉक्टरांच्या अहवालनुसार भावसार याचा गळफास घेऊन मृत्यू (Death) झाल्याचे निष्पन्न झाले असता पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच याप्रकरणाचा पुढील तपास कळवणचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कुलकर्णी, पोलीस नाईक निलेश शेवाळे, संदीप बत्तीसे, नितीन देवरे हे करत आहेत.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik News : सप्तशृंगी गडावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Video: घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओची चोरी; चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com