शेतकऱ्यांनो काळजी घ्या; स्टार्टर झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकऱ्यांनो काळजी घ्या; स्टार्टर झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

पेठ । Peth

तालुक्यातील (taluka) माळेगाव (Malegaon) येथील वखारपाडा गावात (Wakharpada village) एका तरुण शेतकऱ्याचा (young farmer) विजेचा शॉक (Electric shock) लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय मुकुंद शेवरे (Sanjay Mukund Shevare) (वय २८) असे मृत्यू झालेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. हा तरुण शेतकरी पाऊस (rain) आल्याने आपल्या शेतातील मोटरचे स्टार्टर (Motor starter) ओले होऊ नये म्हणून झाकण्यासाठी गेला असता स्टार्टरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने शॉक लागल्याने तो जागीच बेशुद्ध पडला.

दरम्यान, यानंतर कुटुंबीयानी धाव घेत त्यास उपचारासाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात (Peth Rural Hospital) दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. तसेच या प्रकरणी कांतीलाल शेवरे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com