नाशिक : युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन दुर्दैवी अंत

शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असताना घडली दुर्घटना
नाशिक : युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन दुर्दैवी अंत

देवळा | प्रतिनिधी | Deola

शेतात (Farm) रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या २३ वर्षीय युवा शेतकऱ्याचा (Young Farmer) ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबल्या गेल्याने जागीच मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना खामखेडा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे...

नाशिक : युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन दुर्दैवी अंत
Nashik : धरणात बुडून युवकाचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश दिनेश धोंडगे असे मृत्यू झालेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असून महिन्याभरापूर्वी त्याचा विवाह झाला होता. मुळचे निमगोले येथील असलेले धोंडगे कुटुंब पिळकोस शिवारात (Pilkos Shivar) गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे.

नाशिक : युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन दुर्दैवी अंत
बस-ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू; २२ जखमी

शनिवार (दि.२२) रोजी अक्षय तृतीयाच्या दिवशी रात्री ९ वाजता दिनेश धोंडगे यांचा मुलगा राकेश हा घरून ट्रॅक्टरवर शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असताना खामखेडा (Khamkheda) येथील शेवाळे वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीमध्ये ट्रॅक्टर (Tractor) पलटी झाल्याने त्यात तो दबला गेला.

नाशिक : युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन दुर्दैवी अंत
MPSC संयुक्त परीक्षेचे ९० हजारांपेक्षा जास्त हॉल तिकीट Telegram वर लीक... आयोगाचे काय स्पष्टीकरण ?

यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी (Farmers) घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅक्टरखाली दबलेल्या राकेशला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.अवघ्या महिन्याभरापूर्वीच राकेशचा विवाह झाला होता. मात्र, या दुर्दैवी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने संसार उध्वस्त झाला आहे.

नाशिक : युवा शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पलटी होऊन दुर्दैवी अंत
सरकारचं 'डेथ वॉरंट' निघालं, १५ दिवसात...; संजय राऊतांचे मोठे विधान

दरम्यान, या घटनेप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात (Deola Police Station) अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे, पोलीस नाईक सागर पाटील, पोलीस शिपाई सुरेश कोरडे पुढील तपास करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com