नियमित 'ही' योगसाधना कराच; आजार तुमच्या वाटेलाही येणार नाही

Yoga
Yoga

नाशिक | प्रणिता फडणीस

आपले शरीर हे नेहमीच तंदुरुस्त राहावे, यासाठी योग हे अत्यंत प्रभावी मानले जाते. दररोज किंवा नियमित योग केल्यामुळे शारीरिक तसेच, मानसिक आरोग्य देखील सुधारते. आजकाल धावपळीच्या जीवनात आपल्या जीवनशैलीत अनेक प्रकारचे बदल घडून येत असतात. तसेच, कामामुळे ताण-तणाव तर अधिकच वाढत चाललेला आहे. यामुळे शारीरिक व मानसिक व्याधी मागे लागण्यास सुरुवात होते. त्यासाठी योग हा नेहमीच एक उत्तम मार्ग असतो. नियमित योगामुळे आपणांस काय-काय फायदे होतात, ते जाणून घेऊयात...

तणावापासून मुक्ती : नियमितपणे योग केल्यास मानसिक व शारीरिक ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. तसेच, सकाळच्या वेळेला योग केल्यास संपूर्ण दिवस उत्साहात जातो. सकाळी योग केल्याने तुम्ही पूर्ण दिवस तंदुरुस्त राहता आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटू लागते.

वाढत्या वयातील शारीरिक समस्या टाळण्यासाठी : वय वाढल्यानंतर एकामागे एक दुखणे पाठीमागे लागते. त्यामुळे शरीराच्या तक्रारी वाढीस येऊ लागतात. यासाठी जर तुम्ही आधीपासूनच योग करत असाल, तर ते तुमच्याच आरोग्यासाठी आणि शरीरासाठी लाभदायक आहे. म्हणूनच, नियमित योग केल्यामुळे तुमचे वय ही कमी दिसू लागते आणि तुमचे शरीरही निरोगी राहण्यास मदत होते.

शरीरातील साखर नियंत्रित राहते : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत ताण-तणाव वाढल्यामुळे कमी वयातंच मधुमेहाची लागण होण्यास सुरुवात होते. त्यावर योग हे अत्यंत उपयुक्त औषध ठरते. नियमित योग केल्याने शरीरातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच, ताण-तणाव कमी होण्यासही मदत मिळते.

वजन नियंत्रित राहते : आजकालच्या जीवनात कामात व्यस्त असताना तुमचे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे तुमच्या वजनावरही त्याचा परिणाम दिसून येतो. तसेच, सततचे वाढते वजन हे अनेक आजारांच्या निमंत्रणासाठीचे कारण ठरते. त्यासाठी नियमित योग करणे, हा त्यावर सर्वोत्तम उपाय असतो. योगामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहून वजनावरही नियंत्रण राहते.

मानसिक शांतता :

आपल्या मनाला शांतता लाभावी, असे कोणाला वाटत नाही. परंतु, आपल्या रोजच्या धावपळीतंच आपल्या मनाची शांती कुठेतरी हरवून जाते. तीच पुन्हा आणण्यासाठी योग व प्राणायाम करणे अत्यावश्यक असते. योग केल्यामुळे मनाला शांती मिळून डोक्याला अधिक चालना मिळते.

योगाचे फायदे सांगावे तितके कमी आहेत. कोणत्याही मानसिक आणि शारीरिक समस्यांचा उपाय म्हणजे योग. जर तुम्हीही नियमितपणे योग-साधना केलीत, तर त्याचे बहुसंख्य फायदे आपणास पहावयास मिळतील. तसेच, योगामुळे तुम्ही नेहमीच तंदुरुस्त राहू शकता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com