
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षपदी योगीता आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी हे नियुक्तीपत्र दिले आहे.
राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्ष अनिता भामरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केल्याने हे पद रिक्त होते. योगीता आहेर या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या असून, गेल्या मनपा निवडणुकीदरम्यान त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढविली.
मात्र, त्यात त्या पराभूत झाल्या होत्या. त्या अलीकडेच राष्ट्रवादीत सक्रिय झाल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधणीसाठी आपण प्रयत्नशील राहावे, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी योगीता आहेर यांना केल्या आहेत.