महाराष्ट्र राज्य ऑलिंपीक क्रीडा स्पर्धेत आज योगा क्रीडा स्पर्धा

महाराष्ट्र राज्य ऑलिंपीक क्रीडा स्पर्धेत आज योगा क्रीडा स्पर्धा
USER

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र राज्यामध्ये (State of Maharashtra) ऑलिंपीक क्रीडा स्पर्धा -2022 (Olympic Games -2022) आयोजन महाराष्ट्र शाासन (state government) व महाराष्ट्र ऑलिंपीक असोसिएशन (Maharashtra Olympic Association) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध ठिकाणी दि. 1 ते 12 जानेवारी होत आहे.

त्यानुसार नाशिक जिल्हयामध्ये (nashik district) योगा (yoga) व सायकलींग रोडरेस (Cycling Roadrace) या दोन खेळप्रकाराचे आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.2 ते 5 जानेवारी, 2023 या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल (Divisional Sports Complex), हिरावाडी रोड, पंचवटी (panchavati) येथे स्पर्धा होणार आहेत.

या स्पर्धेत राज्यातून 37 महिला खेळाडू, 4 महिला संघ व्यवस्थापक, 3 महिला प्रशिक्षक, तसेच 31 पुरुष खेळाडू, 4 पुरुष संघ व्यवस्थापक, 5 पुरुष प्रशिक्षक, 34 कार्यलयीन व 10 तांत्रिक समिती पदाधिकारी, विविध समिती मिळून 36 सदस्य व स्वयंसेवक मिळुन -128 जण सहभागी होणार आहेत.

सायंकाळी 6 ला स्पर्धेचे उदघाटन विभागीय क्रीडा संकुलात धावपट्टु कविता राऊत (Runer Kavita Raut) व दत्तु भोकनळ यांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागीसर्व खेळाडू, यांना सहभाग प्रमाणपत्र व प्राविण्य प्राप्त खेळाडूंना प्राविण्य प्रमाणपत्र व मेडल्स देण्यात येणार आहे.या स्पर्धा 3 जानेवारी रोजी सकाळी 8 पासून सुरुवात होणार असून 4 जानेवारीच्या रात्री - 8.पर्यंत चालणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com