मध्यवर्ती कारागृहात योग साधना शिबिर

मध्यवर्ती कारागृहात योग साधना शिबिर

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

येथील मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) योगसाधना शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. जून महिन्यात योग दिनानिमित्त (Yoga Day) दहा दिवसाचे योग शिबिर आयोजन करण्यात आले होते...

त्यानंतर आता दर शनिवारी मध्यवर्ती कारागृहात प्रणिक हीलिंग या संस्थेतर्फे योग शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात सुमारे ४० ते ५० बंदीवान भाग घेत असतात.

कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशोक मलवाड, तुरुंग अधिकारी तायडे, शिक्षक पोतदार आदी उपस्थित होते.

मध्यवर्ती कारागृहात मुक्त विद्यापीठाचे योग प्रशिक्षक अभ्यासक्रम हा उपक्रम देखील राबविण्यात येत असतो. यावर्षी सदर अभ्यासक्रमामध्ये १५ बंदिवानाने प्रवेश घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com