जिल्ह्यात प्रथमच नृत्यशैलीतून योगा

जिल्ह्यात प्रथमच नृत्यशैलीतून योगा

सिन्नर। अमोल निरगुडे | Sinnar

जागतिक योगदिनाचे (World Yoga Day) औचित्य साधून येथील प्राचिन गोंदेश्वर महादेव मंदिराच्या (Ancient Gondeshwar Mahadev Temple) आवारात भरतनाट्यम (Bharatanatyam) आणि सूर्यनमस्काराचे (Sun salutation) एकत्रित सादरीकरण करत नृत्यशैलीतून योगादिन साजरा करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात (nashik district) प्रथमच अशाप्रकारे प्रयोग सादर करुन योगादिन (yoga day) साजरा करण्यात आला आहे.

प्राचिन हेमाडपंथी मंदिरावर भरतनाट्यम् कला कोरण्यात आल्या आहेत. गोंदेश्वर महादेव मंदिरावर (Gondeshwar Mahadev Temple) कोरण्यात आलेली अनेक चित्रे हेही या कलेशी मिळतेजुळते आहेत. याचा समन्वय योगाशी आहे हे दाखवून देण्यासाठी कनकलता प्रतिष्ठानच्या नृत्यगुरु कनकलता साकुरीकर (Nrityaguru Kankalata Sakurikar) यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात प्रथमच असा प्रयोग सादर करुन योगादिन साजरा करण्यात आला.

प्रमुख पाहुण्या म्हणून कॉसमॉस इसोल्युशनच्या व्यवस्थापिका आरती ढोले, ब. ना. सारडा विद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष बापु पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कनकलता नृत्यालयातर्फे शिक्षण देण्यात येणार्‍या विविध ठिकाणच्या 7 ते 55 वयोगटातील नृत्यांगणांचा समावेश होता. यात येथील चांडक कन्या, संंजिवनी शाळेतीलही काही विद्यार्थीनींनी भाग घेतला.

यावेळी भरतनाट्यम् व सुर्यनमस्काराचे एकत्रित सादरीकरण करण्यात आले. योगातील काही पूरक हालचाली या नृत्यशैलीतून सादर करण्यात आल्या. यावेळी शिरोभेद, दृष्टिभेद, ग्रिव्हाभेद, मंदलपाद वेद, स्थानकपाद वेद, देवताहस्त, नटेश हो कौतुकम् असे योगाचे 12 प्रकार सादर करण्यात आले. भरतनाट्यम् नृत्यशैलीसाठी उपयोगी प्राथमिक लयबध्द हालचाली कर्नाटकी संगितावर प्रस्तृत करण्यात आल्या.

सिन्नरच्या 20 व नाशिकच्या 30 विद्यार्थीनी अविष्कारात सहभागी झाल्या होत्या. डॉ. प्रियंवदा कवीश्वर व रिंटा किंगर यांनी योगासनामुळे व्यावहारिक जीवनात त्यांचे आजार कसे बरे झाले याविषयी माहिती दिली. सुत्रसंचलन प्रष्ठिस्थानचे अध्यक्ष डॉ. उदय साकुरीकर यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com