डाक विभागाची योगविषयक जनजागृती

डाक विभागाची योगविषयक जनजागृती

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

भारतीय डाक विभागातर्फे ( Indian Postal Department ) त्र्यंबकेश्वर ( Trimbakeshwar ) येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस 2022 (International Yoga Day 2022 ) पूर्वतयारीचा भाग म्हणून योगविषयक जनजागृती ( Awarness of Yoga )कार्यक्रम त्र्यंबकराज मंदिराच्या प्रांगणात आभासी (ऑनलाईन) पद्धतीने दिल्ली येथून थेट प्रक्षेपणाद्वारे पार पडला.

या आभासी कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहिल्यामुळे त्र्यंबकेश्वरचे ठिकाण सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभर जोडले गेले.

कार्यक्रमास योग शिक्षक प्रदीप देशपांडे तसेच योग विद्याधाम तळवाडे त्र्यंबकेश्वरचे सहकारी यांनी विविध प्रकारची योगासने आणि प्राणायाम सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत त्र्यंबकनगरीमधील नागरिक तसेच डाक विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांना प्रात्यक्षिक करून घेतले. तसेच जीवनामध्ये योगाचे स्थान आणि महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम रेल्वे आणि दळणवळणमंत्री अश्विनी वैष्णव (Railway and Transport Minister Ashwini Vaishnav ) यांनी थेट दिल्लीवरून आभासी स्वरुपात साजरा केला. सदर कार्यक्रमाला भारतातून सर्व पोस्ट ऑफिस तसेच इतर विविध विभाग आणि संस्था यांचे कर्मचारी, अधिकारी यांनी प्रतिसाद देऊन आपल्या कार्यक्षेत्रामध्ये योगदिन 2022 ची पूर्वतयारी म्हणून प्राणायाम आणि योगासने करून साजरा केला. तसेच योगाबद्दलची माहिती नागरिकांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून योग शिक्षकांच्या मदतीने करून जीवनात योगाचे महत्त्व आणि जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक विभागाचे प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागातील सहाय्यक अधीक्षक विशाल निकम (मुख्यालय) संदीप पाटील, भटू सूर्यवंशी, मनोज, रूळे, मनीष देवरे, अनिल मोरे, लक्ष्मण चौधरी तसेच राहुल शिंपी, सुभाष जावडे धनंजय शिलेदार, भगवान घुगे, विठ्ठल पोटे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.