येवला | प्रतिनिधी

येवला शहरातील गजबजलेल्या परदेशपुरा भागात दुपारी साडे चारच्या सुमारास घराला अचानक आग लागल्याने एकच धांदल उडाली.

धुराचे प्रचंड लोट निघत असल्याने परीसरात नागरीकांनी धावाधाव सुरू केली. बघता बघता आगीने रुद्र रुप धारण केल्याने अग्निशमन गाडीला प्राचारण करण्यात आले. आगीत तीन घरांचे सर्व संसारपयोगी साहित्य जळून अक्षरशः खाक झाले आहे .

तिन्ही घरातील कुटुंबियांकडे काहीच शिल्लक राहिले नाही . स्थानिक नागरीकांच्या मदतीने आगीवर नियत्रंण मिळवण्यात आले. मात्र हातावर काम करुन व मोलमजुरी करुन पोट भरणारे अतिशय गरीब तिन्ही कुटुंब उघड्यावर आले आहेत

मुश्ताक शेख, आलीम शेख, रज्जाक शेख, असे त्या नुकसानग्रस्त रहीवाशांची नावे आहेत. शासनाने व शहरातील सदन नागरीकांनी या कुटुंबाची मदत करावी, असे अवाहन सामाजिक कार्यकर्ते निसारभाई शेख यांनी केले आहे.