कुस्त्यांच्या दंगलीने झाली यात्रोत्सवाची सांगता
इंदिरानगर | वार्ताहर
सालाबाद प्रमाणे यावर्षीही हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निमित्ताने यात्रोत्सवाचे व कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन पाथर्डी गावामध्ये करण्यात आले होते. या उत्सवाची सांगता कुस्त्यांच्या दंगली ने झाली.
माजी नगरसेवक सुदाम डेमसे, भगवान दोंदे व ग्रामस्थांच्या हस्ते पैलवानांचे जोड लावून कुस्ती (wrestling) स्पर्धेत प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेमध्ये पाथर्डी, विल्होळी, गवळाने, इगतपुरी, भगूर, देवळाली, पिंपळगाव खांब, वाडीवर्हे, सिन्नर व इतर भागातील पैलवानांनी आपला सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेची सुरुवात बाल पैलवानांच्या कुस्त्यांनी झाली. 501 रुपयांपासून पाच हजार रुपये पर्यंतच्या कुस्त्या झाल्या. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातर्फे 21 हजार रुपये बक्षीसाचे विशेष कुस्ती लावण्यात आली.
नगरसेवक सुदाम डेमसे व गंगाधर गवळी यांच्यातर्फे चांदीची ढाल बक्षीस देण्यात आली. पंच म्हणून अशोक कांबळे, रामदास गवळी, संजय जाचक, गंगाधर गवळी, विजय गवळी यांनी काम पाहिले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
यावेळी परिसरातील ग्रामस्थांबरोबरच माजी नगरसेवक संजय नवले, सुदाम कोंबडे, बाळकृष्ण शिरसाट, त्र्यंबक कोंबडे, मदन ढेमसे, सुनील कोथमीरे, एकनाथ नवले, तानाजी गवळी, विष्णू ढेमसे, संजय जाचक, अंबादास जाचक, सुखदेव ढेमसे उपस्थित होते.