Video : यंदाही कोटमगाव येथील विठ्ठलाची यात्रा रद्द

भाविकांचा हिरमोड
Video : यंदाही कोटमगाव येथील विठ्ठलाची यात्रा रद्द

येवला | Yeola

प्रती पंढरपूर (Prati Pandharpur) म्हणून ओळख असणार्‍या तालुक्यातील (Yeola Taluka) कोटमगाव बु॥ (Kotamgoan) येथील श्री विठ्ठल मंदिर (Vithhal Mandir) करोनामुळे यंदाही आषाढी एकादशीलाही (Ashadhi Ekadashi) बंद असून येथील यात्रोत्सव (Yatrotsav) गत वर्षीप्रमाणेच यंदाही देखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे लाखो रुपयाची उलाढाल ठप्प झाली आहे.

तालुक्यातील कोटमगांव बुद्रुकला विठ्ठलाचे कोटमगांव म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक धार्मिक पार्श्‍वभूमीमुळे (Cultural Place) येथे आषाढी एकादशीला दरवर्षी यात्रोत्सव (Pilgrimage) भरतो तर नाशिक, नगर, औरंगाबाद येथून शेकडो दिंड्यांतून लाखो वारकरी (Warkari) विठ्ठल दर्शनासाठी येथे येत असतात. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र देवस्थान मंदिर बंद असून कोटमगाव येथील विठ्ठल मंदिरही बंदच आहे.

आज पहाटे ३ वाजता ग्रामस्थ राजेंद्र चिंतामण काकळीज व अरूण पांडुरंग धनगे यांनी सपत्नीक विधीवत विठ्ठलाची पुजा (Puja) केली. या प्रसंगी अध्यक्ष गणपत ढमाले, पंढरीनाथ पाटील, सोपान ढमाले, तुळशीराम कोटमे, भागवत मोरे, सरपंच तथा राष्ट्रादी कॉंग्रेसच्या महिा आघाडीच्या तालुकाध्यक्षा सोनाली कोटमे, अंजना नरवडे, संजय नरवडे, रामेश्‍वर तांछळे, भगवान तांछळे, भूषण बिलोरे, ग्रामसेवक सुजाता परदेशी आदी उपस्थित होते.

नाही म्हणायला परिसरातील काही भाविक दर्शनासाठी येत होते. मात्र येथील स्थानिक प्रशासनाने मंदिर कुलूप बंद करुन भाविकांनी गर्दी करु नये, असे आवाहन केल्याने भाविक अंतराअंतराने बाहेरुनच दर्शन घेताना दिसले.

आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या (Vithhal Mandir Trust) विश्‍वस्तांची बैठक झाली होती. या बैठकीत आषाढी एकादशी निमित्ताने दर वर्षी भरणारी यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्याचा व मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी माहितीही विश्‍वस्तांच्या वतीने अध्यक्ष गणपत ढमाले यांनी जाहिर जाहीर केली आहे.

भाविकांनी कोटमगाव येथे दर्शनासाठी येण्याचे टाळावे, असे आवाहन करून, एकादशीला केवळ मंदिरात विठ्ठलास अभिषेक महापुजा करण्यात येईल, असे अध्यक्ष ढमाले आणि विश्‍वस्तांंनी स्पष्ट केले होते. येथील यात्रोत्सवात नारळ, पुजा साहित्य, प्रसाद, मिठाई आदींची मोठी रेलचेल असते. यंदा येथे एकही दुकान दिसले नाही. त्यामुळे लाखोरुपयाचे उत्पन्न बुडाले असून ग्रामपंचायतीस मिळणार्‍या उत्पन्नातही सलग दुसर्‍या वर्षीही मोठी घट या यात्रोत्सव बंदीमुळे येणार आहे.

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले हे प्रती पंढरपूर दुसर्‍या वर्षीही बंद आहे. जगभरात करोनाने थैमान घाजलेले असताना व कोटमगाव विठोबाचे या गावाचा दररोजचा संपर्क येवले शहराशी येत असतानाही या गावात एकही करोनाचा रुग्ण सापडला नाही, याचे श्रेय या गावातील मंडळी या पांडुरंगालाच देतात.

- सोनाली कोटमे, सरपंच कोटमगाव विठोबाचे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com