आवास योजनेत चुकीचे निकष; अनेक कुटुंब घरांच्या स्वप्नापासून वंचित

आवास योजनेत चुकीचे निकष; अनेक कुटुंब घरांच्या स्वप्नापासून वंचित

कंधाणे । वार्ताहर | Kandhane

पंतप्रधान आवास योजनेच्या (Prime Minister's Housing Scheme) प्रतीक्षा यादीत नावे समावेश असलेल्या अनेक कुटूंबांना शेवटच्या पाहणी अहवालात चुकीचे निकष लावून डावलण्यात आले आहे.

पाहणीचे शासकीय सोपस्कार पूर्ण करत शेवटच्या क्षणी नावे अपात्र यादीत टाकल्याने अनेक वर्षांपासून पक्क्या घराची आशा बाळगणार्‍या कुटुंबाचेे स्वप्न हवेत विरले आहे. यास्तव डावललेल्या कुंटूंबांची नावे पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी वंचित कुटूंबांनी केली आहे.

याबाबत बागलाण पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत काथेपुरी (Hemant Kathepuri, Assistant Group Development Officer, Baglan Panchayat Samiti) यांना सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय बिरारी (Hemant Kathepuri, Assistant Group Development Officer, Baglan Panchayat Samiti) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन (memorandum) देण्यात आले. सन 2022 पर्यंत सर्व पात्र कुटुंबांना पक्के घर सुनिश्चित करून ग्रामीण भागातील घरांची कमतरता दूर करत पीएमआययू मिशनअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना घर देण्याचा सरकारचा मानस आहे.

त्याअंतर्गत कंधाणेतील अनु. जाती, अनु. जमाती, अल्पसंख्याक व इतर घटकांच्या संवर्गनिहाय प्राधान्य यादीतून 62 पात्र कुटुंंबातील लाभार्थ्यांना चुकीचे निकष लावून पंतप्रधान आवास योजनेपासून वंचित करण्यात आले आहे. शासकीय यंत्रणेतील त्रुटी व चुकीच्या निकषांमुळे अनेक गरजू व पात्र लाभार्थी या यादीतून वगळण्यात आले आहेत. त्यातील अनेक कुटूंंब अठराविश्व दारिद्य्र भोगत असतांना व त्यांच्या नावावर कोणतेही पक्के घर नसतांना संबधित शासकीय अधिकार्‍यांकडून पक्के घर असल्याचा शेरा मारून त्यांना अपात्र यादीत टाकण्यात आले आहे.

चुकीच्या निकषांमुळे अनेक नागरिकांचे पक्क्या घराचे स्वप्न भंगले असून ‘कोणी घर, देत का घर..’ म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. यास्तव अपात्र यादीत टाकलेल्या कुटूंबांची नव्याने योग्य चौकशी करुन त्यांची नावे पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत समाविष्ट करावीत, अशी मागणी पं.स. सहाय्यक गटविकास अधिकारी काथेपुरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.