
ठाणगाव । वार्ताहर | Thangaon
निसर्ग (Nature) हाच आदिवासी समाजाचा (tribal community) खरा गुरु आहे. जल, जंगल, जमीन या देवतांची पूजा आदिवासी समाजातील कोकणा, कोकणी, भिल्ल, वारली, महादेव कोळी,
ठाकूर, कातकरी आदी जमाती शेकडो वर्षांपासून निसर्गातील देव देवतांची पूजा अर्चा करीत आहेत. त्यापैकीच एक वाघ सणाची पूजा केली जाते. यामध्ये वाघदेव, नागदेव, चंद्र, सूर्य, मोर, विंचू, झाडे यांची पूजा वाघबारस या दिवशी केली जाते
दिवाळी (diwali) म्हटली की गोडधोड पदार्थ, नवीन कपड्यांची खरेदी, फटाक्यांची आतषबाजी (Fireworks), लक्ष्मीपूजन, भाऊबीज असा हा आंदोत्सवाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शहरी भागात दिवाळी म्हटले की फटाक्यांची आतषबाजी, घरासमोर लावलेले आकाश दिवाळी पहाटचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम (Cultural events) यांचा समावेश असतो. आदिवासी बांधव (tribal community) हे आपले सर्व सण निसर्गावर आधारित साजरे करत असतात.
दिवाळी सणसुद्धा निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग देवतेची आराधना, आळवणी करीत निसर्गातील वाघ देवाला प्रसन्न करण्यासाठी निसर्गाला कोणतीही हानी न पोहचवता उत्सव साजरे करत असतात. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी या दिवशी घर शेणा-मातीने सारवून काढले जात असे. आजही आदिवासी दुर्गम भागात अनोख्या तर्हेने निसर्गाचे नियम (laws of nature) पाळत सण साजरे केले जातात. घरातील सर्व सदस्य घर सजवण्यासाठी कंबर कसत असतात.दाराजवळ आंब्याच्या पानांच्या मोखवल्याच्या( मखमली)फुलांच्या माळा बांधल्या जातात.
सर्व घर मखमलीच्या फुलांनी सजवले जाते. या दिवाळीचे वैशिष्टय असे की फटाक्यांची आतषबाजी केली जात शेण-मातीने सारवलेल्या घरांच्या भिंती सजवून घराच्या ओट्यावर दिवे लावत घर उजळवण्याची परंपरा आहे. या घरांना पणत्या किंवा कंदील लावलेले नसतात.निसर्गाचे पूजन करणार्या आदिवासींच्या पाडयावर आजही तांत्रिकपणा नाकारून निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता दिवाळीसण साजरा केला जातो.