शैक्षणिक गुढीचे पूजन; कडुनिंब रोपांचे वाटप

पर्यावरणपूरक गुढीपाडव्याचा संदेश
शैक्षणिक गुढीचे पूजन; कडुनिंब रोपांचे वाटप

निफाड। प्रतिनिधी | Niphad

गुढीपाडव्याचा सण (Gudipadva festival) म्हटले की कडुनिंबाला विशेष महत्त्व आहे. वाढते शहरीकरण तसेच बेसुमार जंगलतोड (Deforestation) यामुळे कडुनिंबाच्या झाडांची (neem tree) संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

यावर उपाय म्हणून वैनतेय प्राथमिक विद्यामंदिरात गुढीपाडव्या निमित्त कडुनिंबाच्या रोपांचे वाटप (Distribution of neem seedlings) व वृक्षारोपण (tree plantation) करण्यात येवून शैक्षणिक गुढीचे (Educational Gudi) पूजन करण्यात आले.

न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक विश्वस्त वि.दा. व्यवहारे, विश्वस्त विश्वास कराड, मधूकर राऊत, मुख्याध्यापिका सुजाता तनपुरे आदी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक गुढी चे पूजन करून विद्यार्थ्यांना (students)) कडुनिंबाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा (Traditional costumes) करून नववर्षाच्या स्वागताची तयारी केली.

शिक्षक गोरख सानप यांनी कडुनिंबाच्या झाडाची पाने, साल, लिंबोळ्या यांचे आयुर्वेदिक उपयोग (Ayurvedic uses) सांगितले. किरण खैरनार यांनी गुढीपाडवा या सणाची माहिती दिली. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी एन.एस. आखाडे (Forest Range Officer of Social Forestry Department N.S. Akhade), वनपाल एस.के. चितोडे, प्रदिप पवार, विक्रम वडघुले यांनी कडुनिंबाचे रोपे उपलब्ध करून दिली.

भारतीय सण-उत्सवांच्या (Indian festivals) माध्यमातून विद्यार्थ्यांना कडुनिंबाच्या रोपांची लागवड व संगोपन करून पर्यावरणाचे रक्षण (Protecting the environment) करण्याचा संदेश देणार्‍या उपक्रमाचे न्या.रानडे विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. ल.जि. उगावकर, सचिव रतन वडघुले, विश्वस्त राजेंद्र राठी, राजेश सोनी, किरण कापसे, अ‍ॅड.दिलीप वाघावकर, प्रभाकर कुयटे, नरेंद्र नांदे, पं.स. चे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी कैलास बोरसे, केंद्रप्रमुख निलेश शिंदे आदींसह पालकांनी कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. संजय जाधव यांनी आभार मानले.

कडुनिंबाचे फायदे

कडुनिंबाच्या कोवळ्या काडीने दात घासल्यास दातांचे व हिरड्यांचे आरोग्य सुधारते. वाळलेली पाने धान्यात ठेवल्यास धान्यास कीड लागत नाही. अंघोळीच्या पाण्यात कडुनिंबाची पाने टाकल्याने त्वचारोग होत नाही. लिंबोंळ्यापासून बनवलेले तेल जंतूनाशक असून संधिवात व त्वचारोगावर गुणकारी ठरते.

कोवळी फुलं, पानं, मिरी, सैंधव, हिंग, जिरे, ओवा, गुळ यांचे मिश्रण खाल्ल्याने उत्तम आरोग्य लाभते. जखमा, कृमी, लठ्ठपणा, मुळव्याध, यकृतविकार यावर कडुनिंबाच्या पानांचा रस उपयुक्त ठरतो. कडुनिंबाच्या लाकडापासून दरवाजे, खिडकी, शेतीची औजारे तयार करता येतात व ते जास्त काळ टिकतात. साबण, सौंदर्य प्रसाधने, दंतमंजन यात कडुनिंबाचा वापर होतो.

प्राचीन काळापासून आयुर्वेदात कडुनिंबाला ‘सर्वरोग निवारण’ म्हणून ओळखले जाते. गुढीपाडव्याला कडुनिंबाची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या कार्यात सहभागी होऊन पर्यावरणाची गुढी उभारावी.

- वि.दा. व्यवहारे, विश्वस्त, न्या. रानडे विद्या. मंडळ निफाड

Related Stories

No stories found.